Man Rasrangi Rangale By Promod Bendre (मन रसरंगी रंगले)
Man Rasrangi Rangale By Promod Bendre (मन रसरंगी रंगले)
Couldn't load pickup availability
व्यक्त होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते; परंतु शब्दांतून व्यक्त होण्याची कला सर्वांनाच लाभते असे नाही. त्यातूनही काव्यरूपाने व्यक्त होण्यासाठी जे कसब लागते ते थोड्या भाग्यवंतांनाच मिळते. अशाच काही भाग्यवंतांपैकी श्री. प्रमोद महादेव बेंद्रे ! त्यांचा काव्यसंग्रह ! त्याला मी जीवनाचे रसरंग दर्शन असे म्हणेन. जीवनाच्या विविध रंगांचा आणि त्या रंगप्रतिमांचा कोलाज; तसेच विविध जीवनरसांचा आस्वाद देणारा काव्यसंग्रह ! हा कवितासंग्रह वाचल्यानंतर प्रमोद बेंद्रे हे एक अजब रसायन आहे, हे वाचकाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. या कवितासंग्रहात ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीनही भाषांतून व्यक्त झालेले आहेत. तसेच निसर्गामध्ये हा कवी मनापासून रमतो आणि आनंदित होतो. निसर्गाचे वर्णन एकजीव होऊन, आसुसून करतो. निसर्गामध्ये आणि निसर्गाच्या सौंदर्यामध्ये रममाण होऊन जातो. त्याच्या बऱ्याच निसर्गकविता या त्याच्या मनाची तरलता दाखवतात आणि निसर्गाशी एकरूप होऊन जाणाऱ्या मनाचे दर्शन घडवतात. स्वतःचे कुटुंब, कुटुंबातील पाळीव घटक, स्वतःच्या वाट्याला आलेला निसर्ग आणि स्वतःचे चौकोनी कुटुंब, मुले नातवंडे यांच्यामध्ये प्रचंड गुंतून पडलेला हा हळव्या मनाचा कवी. विविध भाषांमधून विविध अलंकारांमधून विविध रसांमधून आणि विविध रंगांमधून व्यक्त होतो आहे. त्याने तसे व्यक्त व्हावे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आविष्कारप्रणालीतून सतत व्यक्त व्हावे. रसिकांनी त्याला पुरेपूर आश्रय द्यावा, अशी मनापासून इच्छा आणि अपेक्षासुद्धा व्यक्त करतो. -- सुनील देशपांडे
Share
