Mamacha Bal By Pratima Pathak (मामाचं बाळ)- लहान मुलांना आवडेल असं रंगीत पानाचं पुस्तक
Mamacha Bal By Pratima Pathak (मामाचं बाळ)- लहान मुलांना आवडेल असं रंगीत पानाचं पुस्तक
Couldn't load pickup availability
पृष्ठ ८४ (रंगीन पुस्तक) - लहान मुलांना आवडेल असं रंगीत पानाचं पुस्तक
प्रतिमा पाठक यांनी मराठी शिक्षक म्हणून पुण्यातील एका नामवंत विद्यालयात काम केले आहे. मागील अनेक वर्षांपासून त्या लहान मुलांसाठी कथा लिहितात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ तयार करतात. अमेरिका, सिंगापूर आणि साऊथ आफ्रिका येथील विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मराठी शिकवले आहे. तसेच लहान मुलांसाठी त्यांनी सुंदर सचित्र लेखमाला तयार केल्या आहेत.
त्यांची 'मामाचं बाळ' ही अशीच एक सुंदर कथामालिका आहे. यात एक छोटी मुलगी आपल्या मामाला झालेल्या बाळाचं निरीक्षण करते आणि त्याच्या गोष्टी सांगते अशी या पुस्तकाची संकल्पना आहे. 'मामाचं बाळ' या पुस्तकमालिकेत एकूण पाच गोष्टी आहेत. ही सगळी पुस्तके लहान मुलांना नक्की आवडतील. या सर्व पुस्तकांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
अमृता खंडेराव
Share
