Skip to product information
1 of 1

Makrand Saathe Nivdak Nibhand - 2 By Makrand Saathe (मकरंद साठे निवडक निबंध -२)

Makrand Saathe Nivdak Nibhand - 2 By Makrand Saathe (मकरंद साठे निवडक निबंध -२)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मानवी समाजातील विविध लोकसमूहांनी वेगवेगळ्या प्रदेशात आणि वेगवेगळ्या कालखंडात आपापली सांस्कृतिक निजात्मता अथवा ओळख सिध्द करतानाएका बाजूला देवाणघेवाण तर दुसर्या बाजूला एकमेकांवर आक्रमणे यांचा आधार घेतलाही आक्रमणे म्हणजे केवळ शस्त्रास्त्रांनी चढवलेले हल्ले नव्हेतत्यांना आर्थिकवैचारिकधार्मिक अशी अन्य अंगेही होतीया अखंड धुसळणीत सतत खेचल्या जाणार्या मानवसमूहांपुढील महत्वाचा पेच म्हणजे आपली ओळख कायम ठेवीत होणार्या इष्ट परिवर्तनाचा स्वीकार  अनिष्ट परिवर्तनांचा प्रतिकार कसा करायचा.

इतिहासाच्या ओघात मानवी समाज आज - विशेषतः 1990 नंतर - अशा टप्प्यावर आलेला आहे की जेथे हा पेच अत्यंत निकराचा बनलेला आहेसाहजिकच तो समाजाविषयी आस्था असणारे समाजशास्त्रज्ञतत्त्वचिंतकसर्जनशील कलावंत यांच्या विचारांचा विषय झाला आहे.

या चर्चेत सहभागी होऊन महत्वाचे योगदान देणार्या मराठी विचारविश्वातील लेखकांमध्ये श्रीमकरंद साठे यांचे नाव आघाडीवर आहेप्रस्तुत पुस्तक साठे यांच्या याविषयीच्या निवडक चिंतनाचा आणि मुलाखतींचा संग्रह आहेएका ललित लेखकाच्या प्रगल्भ वैचारिकतेचा प्रत्यय या संग्रहातून घेता येतोस्वतः लेखकाच्या विशिष्ट भूमिकेच्या जडणघडणीच्या प्रक्रियेवरही त्यातून प्रकाश पडतोही भूमिका समजल्यामुळे साठे यांच्या नाटकांचे  कादंबर्यांचे आपले आकलनही आपोआपच अधिक समृध्द होईल.

विवेकनिष्ठ संवादावर आधारित प्रगल्भ  सहिष्णू अशा समाजाच्या रचनेकडील आपल्या प्रवासास या लेखनामुळे निश्चितच मदत होईल.

सदानंद मोरे

View full details