Makrand Saathe Nivdak Nibhand - 1 By Makrand Saathe (मकरंद साठे निवडक निबंध -१)
Makrand Saathe Nivdak Nibhand - 1 By Makrand Saathe (मकरंद साठे निवडक निबंध -१)
Couldn't load pickup availability
आजच्या चर्चाविश्वात नेहमी, सत्तर-ऐंशीच्या दशकातली वा आणि नव्वदोत्तरी नाटके वा साहित्य असे उल्लेख येतात. त्यावर साधक बाधक चर्चा एका मर्यादित परिघात होत असते. पण या कालावधीची बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिप्रेक्षातून मीमांसा करणारे लेखन क्वचितच आढळते. मकरंद साठे यांच्या या पुस्तकामुळे ही उणीव अंशतः भरून येण्यास मदत होणार आहे.
ते स्वतः सिध्दहस्त नाटककार, कादंबरीकार तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्यात एक स्वतःच्याच नव्हे तर अन्य लेखकांच्या सृजनाबद्दल कमालीचे ममत्व असणारा, समकालीन बदलत्या राजकीय वास्तवाची आणि समाज संवेदनांची वैश्विक जाण असलेला असा एक प्रगल्भ पण रसिक भाष्यकार आहे. कालचं व आजचं नाटक आणि साहित्य, त्यातील विचार, संवेदना आणि समाज यांची अचूक आणि कमालीची सुसंस्कृत जाण त्यांच्या विवेचनात दिसून येते. त्यामुळे त्यांच्या कला मीमांसेत तेंडुलकरांपासून ते अलिकडच्या धर्मकीर्ती सुमंत पर्यंत, आणि परदेशी विचारवंत आणि कादंबरीकार अल्बेर काम्यूपासून ते एतद्देशीय कमल देसाईं पर्यंत, सगळे आलेले आहेत. महाराष्ट्रात कला, समाज आणि राजकीय भाष्यकारांची मोठी परंपरा आहे. त्यातील दोन म्हणजे गो. पु. देशपांडे आणि राम बापट. मकरंद साठे या दोघांना गुरुस्थानी मानतात ते किती सार्थ आहे, याची साक्ष म्हणजे हे पुस्तक!
Share
