Maifil Bhaktirasachi By Anand Bhate, Dr. ANJALI JOSHI (मैफील भक्तिरसाची)
Maifil Bhaktirasachi By Anand Bhate, Dr. ANJALI JOSHI (मैफील भक्तिरसाची)
Couldn't load pickup availability
पं. भीमसेनजी आणि लतादीदी :
आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता ! पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते.
अभंगांच्या रसाळ शब्दांना प्रवाही करणाऱ्या चाली, राम फाटक, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर अशा दिग्गज संगीतकारांनी दिल्या. त्या चालींना प्रवाही करणारं गायन पं. भीमसेनजी आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी केलं.
यातूनच निर्माण झाली सर्वांगसुंदर भक्तिगीतं... शब्द-अर्थ-भाव-सूर-लय-ताल या सगळ्यांचा असा सुंदर संगम या भक्तिगीतांमध्ये दिसून येतो, की श्रोत्यांना एका परिपूर्ण मैफलीचा आनंद मिळतो..! विख्यात गायक आनंद भाटे यांनी लिहिलेल्या या पुस्तकातूनही अशीच एक मधुर मैफल वाचकांसाठी रुणझुणत आहे...
Share
