Maher + Menaka + Shatayushi Diwali Ank 2024(माहेर + मेनका + शतायुषी दिवाळी अंक 2024)
Maher + Menaka + Shatayushi Diwali Ank 2024(माहेर + मेनका + शतायुषी दिवाळी अंक 2024)
Couldn't load pickup availability
# माहेर + मेनका + शतायुषी दिवाळी अंक २०२४ #
विशेष सावलीमध्ये उपलब्ध
# माहेर #
एकविसाव्या शतकाचं पाव शतक जवळपास संपत आलेल आहे. बलाढ्य अमेरिका विसविशीत झालेली आहे. रशिया झुंजतो आहे. आखाती देशांची तेलावरची मक्तेदारीही लयाच्या वाटेवर आहे. पाहता पाहता चीनची लोकसंख्या मावळतीकडे क्लू लागलेली आहे. जपानची अवस्था शयनकक्षात जाऊन पहुडलेल्या राजासारखी झालेली आहे. ब्रिटनची रया गेलेली आहे आणि फ्रान्स विविध आव्हानांत होरपळतो आहे. या साऱ्याचा आपल्याही जगण्यावर नकळत एक ताण येतो आहे. एकीकडे हे घडत असताना, तंत्रज्ञान क्षेत्र नेहमीप्रमाणेच अत्यंत वेगानं विस्तारतेच आहे.
# मेनका #
'मी खूप उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत', असं एक वाक्य कायम कानांवर पडत असतं आणि आपणही त्या वाक्याचा बऱ्याचदा सहारा घेतलेला असतो. खूप अनुभव गाठीशी आहेत, असा याचा गर्भितार्थ असतो. अनुभवांच्या श्रीमंतीचा व्यवहारात आणि व्यावसायिक जीवनात नक्की उपयोग होतो, परंतु सुखासाठी हे उन्हाळे-पावसाळे पुरेसे नाहीत, असं माझं ठाम मत आहे. त्यापेक्षा 'माझ्या आयुष्यात इतक्या वेळेला मी दिवाळी अनुभवलेली आहे', असं वाक्य प्रचलित व्हावं, असं खूप मनापासून वाटतं. दिवाळीचा आनंद आणि उत्साह साजरा करतानाही तुमचं दुखणं, खुपणं, चिंता, काळज्या, यातना या तर बरोबर असतातच; पण त्यांच्यासहदेखील दिवाळीच्या आनंद आणि उत्साहाला खळ पडत नाही, आणि हेच दिवाळीचं वैशिष्ट्य आहे.
# शतायुषी #
डॉ. संगमनेरकर सरांनी आरोग्य शिक्षणाचं महत्त्व काळाआधीच ओळखून, त्यासाठी गेली बेचाळीस वर्ष अखंड, अविरतपणे 'शतायुषी' या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या निरायम, निरोगी आयुष्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरलेल्या मराठी दिवाळी अंकाचं संपादन आणि त्यातून समाजप्रबोधनाचं लेखन केलं. माझ्या मते, डॉ. अरविंद संगमनेरकर हे समाजस्वास्थ्यकार कै. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यासारखेच पुढच्या पिढीतले द्रष्टे आणि कृतिशील समाजसेवक, धन्वंतरी होते. केवळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या वैद्यक क्षेत्रातल्या प्रज्ञावंतांचे आरोग्यविषयक माहितीपूर्ण मार्गदर्शक लेख हे 'शतायुषी'चं वेगळेपण, त्यामुळेच 'शतायुषी' हा सर्वाधिक खपाचा 'लोकमान्य' मराठी दिवाळी अंक ठरला.
Share


