Mahatma Gandhi Ani Stree Purush Samata By Nisha Shivurkar (महात्मा गांधी आणि स्त्री पुरुष समता)
Mahatma Gandhi Ani Stree Purush Samata By Nisha Shivurkar (महात्मा गांधी आणि स्त्री पुरुष समता)
Couldn't load pickup availability
महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता … दैनंदिन जगण्यातील घरकामाची वाटणी, स्वयंपाक, पती व्यसनी असणे, आळशी असणे, वर्चस्व गाजवणारा असणे, विवाहानंतर मुलीच्या आई-वडिलांची भूमिका अशा अनेक प्रश्नांवर गांधीजींनी आपली मते मांडली आहेत व ती सारी मते पितृसत्ताक रचनेच्या विरोधी आहेत व स्त्री-पुरुषांच्या सर्वंकष समानतेवर आधारलेली आहेत. स्त्रीच्या स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तित्वाचे मूल्य गांधींच्या विवेचनाचा आधार आहे हे यातून वारंवार स्पष्ट होते. शिवूरकर यांनी दिलेल्या दाखल्यांमुळे गांधी आधुनिक नाहीत असे आग्रहाने सांगणाऱ्यांना गांधीचा आधुनिक मूल्यांचा आग्रह परस्पर उत्तर देणारा आहे… …निशा शिवूरकर या पेशाने वकील असल्याने त्यांच्या लिखाणातील युक्तिवादावर त्याचा प्रभाव जाणवतो. अर्थातच इथला त्यांचा युक्तिवाद प्रतिस्पर्ध्याला खोटे ठरवण्याच्या संदर्भातील नाही. कोणालाही खोडून काढणे किंवा निरुत्तर करणे हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्टच नाही. त्यांच्या वाचनातून, चितनातून, मननातून त्यांना जाणवलेले गांधी त्यांनी सुसंगतपणे मांडले आहेत. समतेच्या संदर्भात आणि विशेषतः स्त्री-पुरुषांच्या समतेसंदर्भात तिचे सर्व पैलू त्यांनी विचारात घेतले आहेत. त्यांच्या निष्कर्षांना गांधीवचनांचा भक्कम आधार आहे. स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततिनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यावरच्या लिखाणातून त्यांनी ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. या पुस्तकाचे योगदान यातच सामावले आहे
Share
