Maharashtratil Vaibhavshali Mandir By Omkar Vartale (महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे)
Maharashtratil Vaibhavshali Mandir By Omkar Vartale (महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे)
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यांत असलेली घडीव दगडातली प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील मंदिरे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा अविभाज्य भाग. शेकडो-हजारो वर्षे झालीत या मंदिरांच्या निर्मितीला. कालौघात ऊन-वारा- पाऊस सहन करूनही ही मंदिरे अजूनही तितकीच रसरशीत आहेत. दिमाखात उभी आहेत. दगडांवरची कला आजही तितकीच जिवंत वाटते. भिंतीवरील शिल्पे सजीव वाटतात. या मंदिरांवरती तत्कालीन कारागिरांनी उधळलेली कलाकुसर अक्षरशः भान हरपून टाकणारी आहे. तत्कालीन राजसत्तेच्या आश्रयाखाली उभारलेली ही मंदिरे म्हणजे संस्कृतीचा एक प्रवाह आहे. आपल्या मंदिरांना विचारांची आणि शास्त्राची पक्की बैठक आहे. त्यांना कलेचा परीसस्पर्श लाभला आहे. मंदिरे ही सांस्कृतिक आणि शिक्षणाच प्रवाही केंद्रे होती. मानवी समाजजीवनाचा आरसा होती. त्यामुळेच या वास्तूंचे महत्त्व हे पर्यटनाच्याही पलीकडे आहे. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. अशा काहीशा अपरिचित पण कलेने ओतप्रोत भरलेल्या मंदिरांची ही वैभवशाली सफर...
Share
