Maharashtrachyya Hasyaresha (महाराष्ट्राच्या हास्यरेषा)
Maharashtrachyya Hasyaresha (महाराष्ट्राच्या हास्यरेषा)
Couldn't load pickup availability
Maharashtrachyya Hasyaresha (महाराष्ट्राच्या हास्यरेषा)
लेखक- प्रशांत कुलकर्णी
सामाजिक-राजकीय घटनांवर मार्मिक भाष्य करणारी व्यंगचित्रे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. मराठी माणसाला समृद्ध करणाऱ्या व्यंगचित्रकलेचा आणि ती रेखाटणाऱ्या व्यंगचित्रकारांचा हा शतकभराचा आढावा आहे. मराठीमध्ये व्यंगचित्रकलेचा व्यवहार १८८० पासून सुरू झाला. शं. वा. किर्लोस्कर हे गेल्या शतकातील आद्य व्यंगचित्रकार. त्यांच्यापासून ते आजचा तरुण व्यंगचित्रकार असा मोठा कालखंड या ग्रंथात सामावलेला आहे. सामाजिक हास्यचित्रे, पॉकेट कार्टून, कॉमिक स्ट्रिप, अर्कचित्रे, इलस्ट्रेशन, राजकीय व्यंगचित्रे असा सर्वांगाने वेध या ग्रंथात घेतला आहे. अशा प्रकारचा ग्रंथ इतर भारतीय भाषांमध्ये नाही.
मराठी व्यंगचित्रकलेचे हे एक डॉक्युमेंटेशन तर आहेच, त्याचबरोबर त्याचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारा हा एक अपूर्व ग्रंथ आहे.
Share
