Mahanayak Karn By Narendra Nagdev, Pranav Sakhadev(Translator) (महानायक कर्ण - कर्णाच्या जीवनातील विराट विसंगतींचा यातनामय प्रवास)
Mahanayak Karn By Narendra Nagdev, Pranav Sakhadev(Translator) (महानायक कर्ण - कर्णाच्या जीवनातील विराट विसंगतींचा यातनामय प्रवास)
Couldn't load pickup availability
महाभारतातील एक महानायक म्हणजे कर्ण. त्याचं नाव घेताच मनामध्ये अनेक परस्पर विरोधी प्रतिमा उभ्या राहतात – इंद्राला आपली कवचकुंडलंही दान करणारा कर्ण कधी दानशूरतेच्या सर्वोच्च शिखरावर असतो, तर कधी तो दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या घृणास्पद कृत्यात सहभागी होतो. या कादंबरीचा निवेदक कर्णाचा बालपणीचा मित्र आणि हितचिंतक आहे. सूतपुत्र असल्याने कर्णाला भोगावे लागलेले अपमान तसंच सर्वोत्तम धनुर्धर म्हणून झालेला त्याचा विकास यांचा तो साक्षीदार आहे. तो केवळ त्याच्या वीरत्वाचे, दानशूरतेचे प्रसंग कथन करत नाही, तर तो कर्णाचं पतन झाल्यामुळे मित्र म्हणून त्याला होणाऱ्या यातनाही झेलतो.
पाप-पुण्य यांच्यात दुभंगलेलं जीवन कर्ण बेधडकपणे जगतो खरा, परंतु अंतिमतः तो मृत्युशय्येवर असताना पाप-पुण्याच्या पारड्यांतील कोणतं पारडं जास्त जड आहे हे ठरवण्याची जबाबदारी श्रीकृष्णावर येते. तेव्हा तो जे उत्तर देतो, ते चिंतनीय तर आहेच, परंतु कर्णाच्या जीवनाच्या कहाणीचा सर्वोच्च शिखरबिंदूही आहे.
Share
