Madhyayugin Marathi Wangmay : Chintan Aani Charcha By Satish Badwe (मध्ययुगीन मराठी वाड्मय : चिंतन आणि चर्चां)
Madhyayugin Marathi Wangmay : Chintan Aani Charcha By Satish Badwe (मध्ययुगीन मराठी वाड्मय : चिंतन आणि चर्चां)
Couldn't load pickup availability
"मध्ययुगीन वाङ्मयाविषयीचे चिंतन व चर्चा हा या ग्रंथाचा गाभा आहे. मौखिक व लिखित अशा दोन्ही प्रकारच्या लेखनातून हा वाङ्मय प्रवाह वाहत आला आहे. मौखिक परंपरा व लोकपरंपरा यांचे संमिश्रण या काळात आढळते. मराठीचा ठासून पुरस्कार करण्याची भूमिका याच काळात मांडली गेली. कवितेची वैविध्यपूर्ण रूपे व रचनाप्रकारांची रेलचेल उलगडून दाखविणारा हा कालखंड आहे. या लेखनात केवळ धार्मिकता, अध्यात्माचा सोस आहे असे म्हणता येणार नाही. त्यातील आत्माविष्कार, कलाभिव्यक्ती, सामान्य माणसांविषयीचा प्रकट होणारा कळवळाही ध्यानात घेता येतो. या वाङ्मयातील रचनेचे सौंदर्य, त्यातून प्रकटणारी सामाजिकतेची दृष्टी आणि लोकसमूहाला केलेले आवाहन लक्षणीय ठरते. एका व्यापक पटावर आविष्कृत झालेल्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयनिर्मितीविषयीची निरीक्षणे व शोध चार भागांमध्ये मांडलेला आहे. ग्रंथकर्तृत्व, वाङ्मय विशेष, काव्यलेखनाचे विविध प्रवाह, अभिव्यक्तीतील सौंदर्यदृष्टी, धर्मसंप्रदायांची कामगिरी, गद्य लेखनाचे वेगळेपण, पर्यावरणीय संवेदन, संहिता चिकित्सा, संशोधनाच्या वाटा अशा अनेकांगांनी घेतलेला धांडोळा अभ्यासपूर्ण पद्धतीने इथे प्रकटलेला आहे. एका अर्थी हा परंपरेतील सत्त्वांशाचा शोध आहे. वाङ्मयेतिहासाला पूरक ठरणाऱ्या या लेखनात मागोवा, चिंतन, निरीक्षणे, संहिताकेंद्री व आशयकेंद्री दृष्टी केंद्रवर्ती आहेत. त्यामधून मध्ययुगीन वाङ्मयाचा बहुमुखी पट उभा राहतो आणि मूल्यविचाराच्या अनुषंगाने या वाङ्मयाच्या आशय व अभिव्यक्तीचे पदर उलगडले जातात."
Share
