Madhyam Varg Ubha Aadva Tirpa By Ram Jagtap
Madhyam Varg Ubha Aadva Tirpa By Ram Jagtap
' गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता? जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता? संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक प्रभाव असलेला वर्ग कोणता? जागतिकीकरणानंतर बदल, संधी, पैसा, सुख, स्वप्नपूर्ती यांच्या स्थित्यंतराच्या वावटळीत सापडलेला वर्ग कोणता? ‘टुकीने संसार’ आणि ‘नेकीने नोकरी’ करणारा एकेकाळचा वर्ग कोणता? जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक टीका होणारा वर्ग कोणता? एकाच वेळी अचंबा, मत्सर, ईर्ष्या, असूया, हेवा, स्पर्धा, आदर, कौतुक, अनुकरणाची तीव्र मनीषा, तिरस्कार यांसारख्या परस्परविरोधी भावभावनांचा धनी होणारा वर्ग कोणता? अशा या मध्यम वर्गाचे कालचे-आजचे आदर्श, परंपरा आणि प्रेरणा यांचा ऊहापोह करत त्याची उभी, आडवी, तिरपी चर्चा करणारा लेखसंग्रह. मध्यम वर्ग उभा, आडवा, तिरपा '