1
/
of
1
Lokparampara Naatya Aani Avishkar By Shrikurshn Kakade (लोकपरंपरा नाट्य आणि अविष्कार)
Lokparampara Naatya Aani Avishkar By Shrikurshn Kakade (लोकपरंपरा नाट्य आणि अविष्कार)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लोकपरंपरेतील नाट्याविष्कारांनी मराठीजनांना भरपूर निखळ आनंद दिला आहे. वासुदेवाच्या पहाटगाण्यापासून मध्यानरातीच्या कीर्तनापर्यंत सारे प्रहर लोकपरंपरेतील कलावंतांनी आनंद वाटण्याबरोबरच प्रबोधनही केले आहे. येथील मनांचा दुःखभार कमी करीत मानसिक आधार दिला आहे. जगण्याची नवी उमेद दिली आहे. हे सगळेच कथनकार येथील समाजाचे आत्मिक उन्नयन घडवत होते.
बदलत्या समाजजीवनात लोकपरंपरांचे महत्त्व कमी होत गेले असले तरी अजूनही कुळाचार, गावजत्रा, ग्रामदेवीची पूजा या निमित्ताने विधिनाट्ये होत असतातच. इतकेच नव्हे तर, जन्मापासून मृत्यूपर्यंत या लोककलांनी येथील माणसांचे जीवन व्यापून टाकले आहे. या विधिनाट्यातील नाट्य कसे असते, हे कलावंत अभिनयाचे कौशल्य कसे दाखवतात, हा आविष्कार होतो कसा, याचे दर्शन या पुस्तकातून घडते.
Share
