Lokpal Raja Sayajirao By Baba Bhand (लोकपाल राजा सयाजीराव)
Lokpal Raja Sayajirao By Baba Bhand (लोकपाल राजा सयाजीराव)
Couldn't load pickup availability
कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अचानक एक शेतकर्याचा पोर राजा बनतो आणि आपल्या गरीब रयतेचा पोशिंदा होतो, अशा अलौकिक राजाची ही चरित्र्यगाथा. जगभरच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक सुधारणा आपल्या राज्यात रुजविण्याचा अथक प्रयत्न करणारा राजा ही महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ओळख आहे. ब्रिटिश सत्तेला न जुमानता त्यांच्याविरुद्ध लढण्यार्या भारतीय क्रांतिकारकांची सातत्याने पाठराखण केली. ब्रिटिशांनाही हेवा वाटेल अशी राजा व प्रजा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी आधुनिक प्रशासननीती रुजविली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यताबंदी, वेठबिगारी संपविणे यासाठी कायदे केले. ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य, जलसिंचन, आरोग्यसंरक्षण, महिला सक्षमीकरण, सार्वजनिक ग्रंथालये, कलाप्रदर्शने अशा विविध सुधारणांचे प्रकल्प राबविले.
विवेकांदांनतर दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्षस्थान भूषवून जागतिक पातळीवर भारताचा ठसा निर्माण केला. म. फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, लोकमान्य टिळक, न्या. रानडे, ना गोखले, योगी अरविंद या सर्व प्रज्ञावंतांना त्यांचे भक्कम वैचारिक व आर्थिक पाठबळ लाभले. अक्षरओळख नसताना राजपद प्राप्त झालेल्या या माणसाने ही किमया अशी घडवून आणली याचा शोध घेण्यासाठी त्यांची पत्रे, भाषणे, ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे आणि अनेकविध संदर्भ साहित्याचा मागोवा घेऊन बाबा भांड यांनी हे चरित्र लिहिले आहे. राजकारण, प्रशासन, व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यक्तींना तर हे चरित्र मार्गदर्शक आहेच; परंतु शून्यातून स्वत:चे उज्जल भविष्य घडवू इच्छिणार्या नव्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल अशी ही संघर्षगाथा आहे.
डॉ. रमेश वरखेडे
Share
