Skip to product information
1 of 2

Lokmanya Tilakanchya arthshastriya Vivechanatil Atmanirbhar bharat By Dr. Pravin Jadav And Dr. Avinash Kulkarni(लोकमान्य टिळकांच्या अर्थशास्त्रीय विवेचनातील आत्मनिर्भर भारत)

Lokmanya Tilakanchya arthshastriya Vivechanatil Atmanirbhar bharat By Dr. Pravin Jadav And Dr. Avinash Kulkarni(लोकमान्य टिळकांच्या अर्थशास्त्रीय विवेचनातील आत्मनिर्भर भारत)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

“अर्थशास्त्राचे असे एक तत्त्व आहे की, शेत करणारा प्रत्येक मनुष्य आपआपल्या जमिनीच्या तुकड्याचा मालक असला म्हणजे त्याला जमिनीची सुधारणा करण्याची उमेद येऊन त्याच्या श्रमाचे पूर्ण फळ त्यास मिळते. “
लोकमान्य टिळक

अॅडम स्मिथ असो वा डेव्डिड रिकार्डो, २०व्या शतकातील मिल्टन फ्रिडमन असो वा अर्थर डंकेल अशा अर्थतज्ज्ञांनी मुक्त बाजार अथवा खुल्या आंतरराष्ट्रीय बाजाराच्या संकल्पनेतून जागतिकीकरण व उदारीकरणाची मांडणी केली व तिचे जोरदार समर्थन केले. अशा उदारमतवादी अर्थशास्त्राचे विश्लेषकांच्या अर्थशास्त्रीय संकल्पना व सिद्धांतांचे विश्लेषण लोकमान्य टिळकांनी त्यांच्या विविध अग्रलेखांमध्ये केले. त्यावरून असे निष्कर्षास येते की, लोकमान्य टिळक त्यांच्या अर्थशास्त्रीय विवेचनात आणि विश्लेषणात ज्या कालचक्राची गती स्पष्ट करतात ती अर्थशास्त्रीय कालसुसंगत असे अर्थशास्त्राचे स्वरुप स्पष्ट करणारी आहे.
काही इतिहास व अर्थशास्त्राचे संशोधक व विश्लेषक यांच्या मते लोकमान्य टिळकांचे विवेचन व विश्लेषण हे मार्स यांच्या समाजवादी संकल्पनेकडे झुकलेले होते. परंतु मी त्यांच्या अग्रलेखांचा जो अभ्यास केला त्यातून मला असे निष्कर्षास आले की, लोकमान्य टिळकांनी तर मार्सवादी सैद्धांतिक विचारांची मर्यादाच विशद केली आहे. त्यांच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे स्वरुप मात्र फ्रेड्रिक लिस्ट यांच्या राष्ट्रवादी अर्थशास्त्रीय विचारसरणीच्या विचारांशी मिळतेजुळते आहे. 
- प्रस्तावनेतून

View full details