Lift Number 6 By Govind Mukund Phadke ( (लिफ्ट नंबर ६))
Lift Number 6 By Govind Mukund Phadke ( (लिफ्ट नंबर ६))
Couldn't load pickup availability
रहस्यमय, भयकथा मला खूप आवडायच्या. सुरुवातीला बाबुराव अर्नाळकर मग एस. एम. काशीकर अशी सुरुवात झाली. इंग्रजीमधील जेम्स हॅडली चेस, अगाथा ख्रिस्ती, यांच्या पुस्तकांची पारायणे झाली. रत्नाकर मतकरी, नारायण धारप यांच्या भयकथांमध्ये उत्सुकता वाढली. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू झाले. एकदा एक भीतिदायक स्वप्न पडले. सकाळी उठल्यावर विचार केला आणि वाटले याच्यावर एखादी गोष्ट लिहिली तर? आणि "लिफ्ट नंबर ६" या कथेचा जन्म झाला. मग लिहीत गेलो. आणि योगायोगाने मानसी ताम्हणकर यांची ओळख झाली. मग बोलता बोलता मीपण रहस्य आणि भयकथा लिहितो म्हटल्यावर त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर कथा संग्रहासाठी मी मानसीताईंच्या प्रोत्साहनाने लिहीत गेलो, त्यांनी काहीवेळा कथेत फेरफार सुचवले आणि मी जमेल तसे वेळ काढून ते केले. आज " लिफ्ट नंबर ६” हा कथासंग्रह वाचकांना अर्पण करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्यातील नवोदित लेखकाला जागृत करून, प्रोत्साहन देण्यास आणि माझ्यासारख्या लेखकाचा हा कथासंग्रह प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखवणाऱ्या मानसीताईंचे खूप खूप आभार.