Skip to product information
1 of 1

Leap Frog By Mukesh Sud, Priyank Narayan, Sudarshan Aathwale(Translators)( लीप फ्रॉग )

Leap Frog By Mukesh Sud, Priyank Narayan, Sudarshan Aathwale(Translators)( लीप फ्रॉग )

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग – बेडूकउडी – म्हणजे, एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने, कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या, तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बाणवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.

पहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची. दुसरी पद्धत आहे काही वर्तनपद्धतींमागची कारणे समजून घेऊन, त्यांची काळजी घेऊन, विविध उपाय वापरून स्वतःला योग्य वर्तनासाठी उद्युक्त करण्याची, प्रोत्साहित करण्याची. तिसरी पद्धत आहे आपल्या ज्ञानाच्या सीमांची जाण ठेवून आपल्या बुद्धिमत्तेविषयी विनयशीलता बाळगण्याची. चौथ्या पद्धतीत अनेक क्षेत्रांमध्ये मुक्त नर्तन करतकरत कल्पनांच्या शृंगारातून नव्या कल्पनांच्या जन्माची अनोखी संकल्पना मांडली आहे. त्यानंतर सभोवतालच्या गोंधळाविषयी, अतोनात पसाऱ्याविषयी सावध करून त्यातील अनावश्यक, बेडेपणाचे जे-जे असते ते ते काढून टाकून आपल्याशी संबंधित आणि आपल्याला अत्यावश्यक असलेल्या गोष्टींची विचारपूर्वक निवड करून त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पटवून दिली आहे. शेवटची पद्धत तुम्हाला नव्या उद्योजकासारखा विचार करायला शिकवते आणि आपल्याला जे हवे असते, जाणून घ्यायचे असते, ते धाडसी उत्साहाने विचारण्याचे महत्त्व सांगते.

View full details