Skip to product information
1 of 1

Kundalik Gore Yanche Likhit 3 Gajaleli Natake Ekacha Sanchaat (कुंडलिक गोरे यांचे लिखित ३ गाजलेली नाटके एका संचात)

Kundalik Gore Yanche Likhit 3 Gajaleli Natake Ekacha Sanchaat (कुंडलिक गोरे यांचे लिखित ३ गाजलेली नाटके एका संचात)

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 399.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

1. बाई बाटली पुढाऱ्यांन गाठली |  पाने १२० | किंमत २००/-

समाज म्हटलं की त्यात भलं बुरं आलंच. काही तुपाशी खातात तर काही उपाशी राहतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद नसल्यास सामान्य माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. गरिबी आणि अज्ञान यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येकानं शिकलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. शिक्षण आणि सुसंस्कृत विचारांमुळे चुकीच्या गोष्टींना थारा राहत नाही. चुकीच्या प्रवृत्ती आणि दहशतीच्या सावटातून समाज मुक्त होऊ शकतो. यासाठी सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. विचारी, अभ्यासू माणसांच्या हातात जबाबदारी दिली, तर व्यसन आणि गुन्हेगारीला थाराच उरणार नाही. समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुदृढ होईल का? हे मात्र आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.

2. हे फूल गुलाबाचे । पाने ८० | किंमत १५०/-

परमेश्वराने माणसाला दिलेली एक अमूल्य देणगी म्हणजे प्रेम. गुलाबाचे फूल हे प्रेमाचे प्रतीक. फूल जितके सुंदर असते तितकेच त्याचे काटे बोचरे असतात, पण ते फुलाला जपण्यासाठी असतात. खरं प्रेम हे काट्यांना जपत फुलाला हाताळण्यात असते. ते एक कसब असते. प्रेमाला स्वार्थाचा, अहंकाराचा स्पर्श झाला, की त्याचे निर्माल्य व्हायला वेळ लागत नाही. प्रतिक्षा ही प्रेमाची व्याख्या असते. प्रेमाने दिलेला ताजा, प्रसन्न गुलाब जपून ठेवून मीलनाची प्रतिक्षा केली, तर वाळलेल्या पाकळ्यांतूनही प्रेमगंध दरवळतो. प्रेम असेच हवे, प्रतिक्षेतून दरवळणारं, फुलणारं, नितळ आणि विश्वासाने भारलेलं प्रेम हे प्रेमच राहतं, त्याला दुसरं नाव नाही देता येत.

3. तुळस हसली अंगणी  | कुंडलिक गोरे । पाने ७२ | किंमत १५०/-

हसली अंगणी तुळस ही आरोग्याचे प्रतीक असून, तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती दिवस-रात्र आपल्यासाठी प्राणवायू निर्मितीचे कार्य करते. त्यामुळेच तिला विशेष महत्त्व आणि देवत्व प्राप्त झाले आहे. घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवले तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आणि समृद्धी वाढते. जसे तुळशीला कीड लागली की ती फक्त एक झुडूप ठरते, तसेच घरात चुकीच्या रूढी आणि वाईट सवयी शिरल्या की घरपण लयास जाते. संस्कारांचे खतपाणी घालून आपल्या अंगणातील तुळशीला सतत हसत ठेवलं, तर संपूर्ण घराचे नैतिक आणि आर्थिक आरोग्य सुधारेल यात शंकाच नाही

View full details