Skip to product information
1 of 1

KSagar Shabdsangrah Marathicha (शब्दसंग्रह मराठीचा )

KSagar Shabdsangrah Marathicha (शब्दसंग्रह मराठीचा )

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language version

के'सागरीय. . मराठी विषयांतर्गत मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, इंग्रजीत भाषांतर, सारांशलेखन, उताऱ्यावरील प्रश्न असा अभ्यासक्रम असतो. त्यातही मराठीच्या शब्दसंग्रहावर अधिक भर दिला जातो. मराठीच्या शब्दसंग्रहाचे उपरोक्त परीक्षांच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व लक्षात घेता या सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून आणि त्याचवेळी परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या प्रश्नधर्तीचा विचार करून रचना केलेल्या केवळ मराठीच्या शब्दसंग्रहावर विशेष भर देणाऱ्या संदर्भाची आवश्यकता होती. या आवश्यकतेतूनच अस्मादिकांनी आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून आणि स्पर्धा परीक्षांच्या अखंड अभ्यासातून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे. पुस्तकाची रचना करताना प्रा. समाधान शिंदे यांच्या मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, डॉ. अनिरुद्ध यांच्या महाभरती मराठी, डॉ. लिला गोविलकर यांच्या अनिवार्य मराठी व अस्मादिकांच्या अनिवार्य मराठी व संपूर्ण मराठी या पुस्तकांचा मुक्त संदर्भ घेतला आहे. प्रा. समाधान शिंदे, डॉ. लिला गोविलकर व डॉ. अनिरुद्ध यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. " प्रत्येक प्रकरणात विषयाशी निगडित माहिती देणारे टेबल्स व विविध प्रकारचे भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न दिले असून पुस्तकाच्या शेवटीही भरपूर संमिश्र वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहेत. एकूण मराठीच्या शब्दसंग्रहावर आधारित कोणत्याही प्रकारचा वा कितीही अवघड प्रश्न आला तरी त्याचे उत्तर आपणास देता यावे, असे पाहिले आहे. . आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K'Sagar)

View full details