Krushi Paryatan Udyojakanchi Yashogatha By Ganesh Chappalwar (कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा)
Krushi Paryatan Udyojakanchi Yashogatha By Ganesh Chappalwar (कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा)
Couldn't load pickup availability
कृषी पर्यटन उद्योग म्हणजे उच्च सामाजिक प्रतिष्ठा नि भरघोस आर्थिक वैभव प्राप्त करून देणारे चालू वर्तमान आणि उद्याचे महत्त्वाकांक्षी भविष्य होय. ग्रामीण संस्कृती आणि शहरी जीवनास जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या य उद्योगाचा सांगोपांग धांडोळा या पुस्तकाच्या पानापानांतून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कृषी पर्यटन उद्योजक म्हणून यशस्वी कसे व्हायचे, याची सविस्तर नि सुयोग्य माहिती सुलभ पद्धतीने यात मांडली आहे. कृषी पर्यटन उद्योजक म्हणून यशस्वी कसे व्हावे हे सांगतानाच आधुनिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीत केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, कृषी पर्यटन उद्योजकांनी राबविलेले कल्पकता, कार्यकुशलता, आदर्श, यशस्वी आणि प्रेरणादायी प्रयोग यांची ओळख या पुस्तकातून होते. अनेक कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी व परीक्षण करून त्यासाठीचे संशोधन केल्यानंतर साकारलेला हा पुस्तकरूपी संदर्भग्रंथ कृषी पर्यटन उद्योगातील चढउतार, अडीअडचणी, आव्हाने व संधी यांचा चौकस वेध घेतो. 'कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा' हे पुस्तक महाराष्ट्रातल्या केवळ १५ उद्योजकांच्या यशाची गाथा सांगून थांबत नाही, तर उद्याच्या नव्या उद्योजकांच्या मनात स्वप्नांची बीजे पेरते. म्हणूनच हे पुस्तक वाचक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, कृषी आणि पर्यटन अभ्यासकांच्या संग्रही असायलाच हवे.
Share
