Krodhagni Rajendra Cholacha By Satyaki (क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा - सत्यकी )
Krodhagni Rajendra Cholacha By Satyaki (क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा - सत्यकी )
Couldn't load pickup availability
क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा | पाने ३८४
पुस्तकाविषयी इ.स. १००१. वयाच्या ३०व्या वर्षी महमूद गझनवी साम्राज्याची सूत्रे हाती घेतो आणि आपली नजर पूर्वेकडे वळवतो. मज़हबी उन्मादाने प्रेरित होऊन, तो भारतवर्षावर (ज्याला त्या वेळी भिन्नधर्मीयांची आणि काळ्या जादूची भूमी, तसेच अमाप संपत्ती आणि कीर्तीचे स्थान मानले जात होते) अराजकता आणि हत्याकांडांची एक भयानक मालिका सुरू करतो. असा अत्याचाराचा कहर जगाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. इ.स. १०२५. चेरा आणि पांड्यांना पराभूत केलेला, गंगा जिंकलेला, आणि वंग प्रदेशाचा अधिपती असलेला राजेंद्र चोल आपली समुद्री मोहीम श्रीविजय साम्राज्याकडे सुरू करायला तयार असतो. तेव्हाच सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते.
याच दरम्यान, अनाकलनीय लिपीतील एक प्राचीन पुस्तक त्यात दडलेली रहस्यं उलगण्यासाठी त्याच्या पालनकर्त्याला साद घालत असते. तर इकडे क्रोधाने भरलेला एक युवक युद्धासाठी अतिशय आतूर असतो. त्याचे प्रारब्ध अजून पूर्ण झालेले नाही. तो जिथे जातो, तिथे विध्वंस माजवतो आणि विनाशाच्या खुणा मागे सोडत पुढे जातो. आदिम परंपरेतील एक घातक योद्धा स्त्री, आपल्या सुलतानाच्या लालसेने भरलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करते. या वैकल्पिक कालरेषेत, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसामुळे चोल राजा प्रचंड क्रोधित होतो, आणि तो अचानक आपली योजना बदलतो. तो महमूदला थेट सामोरे जाण्याचा निर्णय घेतो. राजेंद्र चोलच्या या एका निर्णयामुळे भविष्य बदलेल का, भविष्यातील घौरी, खिलजी, बाबर यांना रोखता येईल का आणि वारंवार होणाऱ्या हत्याकांडांना आळा बसेल का? की भारतवर्षच अस्तित्वात राहणार नाही? ही पूर्वपक्ष, स्वयंबोध आणि शत्रुबोध यांची कथा आहे... धर्म आणि अधर्म यांच्या युद्धाची कहाणी. हे युद्ध प्रत्यक्षात कधी झाले नाही, पण झाले असते तर इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता त्यात होती.
Share
