Skip to product information
1 of 1

Kolhaal By Shwetal Parab (कोल्हाळ)

Kolhaal By Shwetal Parab (कोल्हाळ)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

श्वेतल परब यांची ‘कोल्हाळ’ ही कादंबरी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विनाअनुदान धोरणावर सखोल आणि चिंतनपर मांडणी करते. शासन आणि स्वयंघोषित शिक्षणसम्राटांनी नफेखोर वृत्तीतून आपल्या शिक्षणसंस्थांमार्फत सुरू केलेल्या विनाअनुदानित शाळांमधून तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची सक्ती करणारी व्यवस्था शिक्षकांचे अधःपतन करते. बेकारीच्या आवर्तात सापडलेल्या उच्चविद्याविभूषितांना आपल्या ऑक्टोपसी विळख्यात ओढून त्यांचे संपूर्ण आयुष्य सत्त्वहीन करून टाकणाऱ्या व्यवस्थेची कोल्हाळकृत्ये या कादंबरीत उजागर होतात. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात जे विनाअनुदानित धोरण राबविले गेले त्याचे प्रत्यक्ष परिणाम, अध्ययन आणि अध्यापनाच्या चुकलेल्या धोरणाचा वास्तवदर्शी लेखाजोखा इथं येतो. हा अनुभवपट एका शिक्षिकेच्या नजरेतून आल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंब यांची होणारी परवड अधोरेखित होतेच, शिवाय व्यवस्थेच्या पातळीवर गोष्टी कशा घडतात आणि कशा घडवल्या जातात याचं दाहक चित्रणही कादंबरी करते. अनुभवांच्या नेमक्या आणि नेटक्या निवडीतून निवेदनाला इथं समृद्धपणा आलेला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी सत्तेशी संघर्ष करूनही निराशा, उद्विग्नता, हतबलता, आत्मक्लेश अशा मानसिक आवर्तात सापडलेल्या माणसांच्या आयुष्याच्या साऱ्याच दिशा ओस झाल्याचा शोकात्म प्रत्यय नित्याचाच होतो. नव्या पिढ्यांचे आयुष्य घडवणारे हात कधी गळफासात अडकतात तर कधी दिवास्वप्न पाहात भ्रमिष्ट होत जातात. यातून ज्ञानदानाची ही पवित्र व्यवस्था किती विरुपित झाली आहे, याचे प्रत्ययकारी चित्रण श्वेतल परब यांनी या कादंबरीत केले आहे. मराठी कादंबरीत चित्रित झालेला शैक्षणिक अवकाश हा एकतर विद्यार्थीकेंद्री किंवा विद्यापीठ, प्राध्यापकांच्या स्टाफरूममधील चर्चा अशा मर्यादित स्वरूपाचा असतो. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जगण्याचे स्खलन आणि व्यवस्थेने गिळंकृत केलेल्या छोट्या समूहघटकांचे दबले पिचलेले आवाज असा वेगळा आणि दुर्लक्षित अवकाश या कादंबरीत आला आहे. ते असंख्य आवाज या कादंबरीत कोल्हाळ माजवतात, हे या कादंबरीचे बलस्थान ठरते. – गोविंद काजरेकर

View full details