Kimayagar By V. V. Shirwadkar / Sadashiv Amarapurkar (किमयागार)
Kimayagar By V. V. Shirwadkar / Sadashiv Amarapurkar (किमयागार)
Couldn't load pickup availability
हेलन केलर हे म्हटले तर एकूण मानवजातीच्या इतिहासातील अद्भुत पात्र. ‘पंगु लंघयते गिरीम्’ कोटीतील पराक्रम या मूकबधिर आणि अंध असलेल्या मुलीने प्रत्यक्षात करून दाखवला. परंतु ही किमया केली ती तिला या दिशेने उद्युक्त करणाऱ्या ऍनीने. हेलनला तिच्या भोगांपाशी न सोडता तिच्यातील शक्यता आजमावून तिला जिद्दीने, प्रेमाने आणि क्वचित कठोर होऊन आपल्या व्याधींशी झुंज द्यायला प्रवृत्त करणे ही एक किमयाच होती. हा विषय घेऊन ‘द मिरॅकल वर्कर’ हे नाटक आणि त्यानंतर सिनेमा इंग्रजीत तयार झाला. कुठल्याही एखाद्या आंधळ्या-बहिऱ्या-मुक्या व्यक्तीला कसे वागवावे, त्यासाठी समुपदेशक आणि ती व्यक्ती यांच्यात भावबंध कसे निर्माण होणे आवश्यक आहे, त्या उपचारात प्रयोगांचे महत्त्व अशा कितीतरी गोष्टी या नाटकाच्या कथावस्तूत दिसून येतात. हाती आलेल्या चित्रपटकथेच्या आधारे सदाशिव अमरापूरकर यांनी तयार केलेली नाट्यसंहिता वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या संवादांनी परिपूर्ण झाली.
मूकबधीर आणि अंध असलेल्या हेलन केलर हिला जगण्याची दिशा दाखवण्याचे काम केले ते तिची शिक्षिका ऐनी हिने. या विषयावरच्या ‘द मिरॅकल वर्कर’ या नाटकावर ‘किमयागार’ हे नाटक आधारित आहे.
Share
