Khushboo Aani Tochnarya Goshti By Nitin Thorat
Khushboo Aani Tochnarya Goshti By Nitin Thorat
Couldn't load pickup availability
या पुस्तकातल्या कथा अगदी खऱ्या. निखळ भावनेतून व्यक्त झालेल्या. कुणाला या कथा वाचून राग येऊ शकतो, सहानुभूती वाटू शकते, हसू येऊ शकतं किंवा काहीतरी भंपक लिहिलंय असंही वाटू शकतं. खोटं वाटलं तरीही हरकत नाही.
पण, तुमच्या चांगुलपणाच्या बुरख्याला नख लावण्याचं काम हा कथासंग्रह करेल. त्यामुळे वास्तवापासून चार हात लांब राहून नाटकी आयुष्याच्या थंडगार पाण्यात डुंबून राहणं तुम्हाला पसंत असेल तर हा कथासंग्रह वाचून तुमच्या पदरी निराशाच पडेल. त्याबद्दल क्षमस्व.
‘खुशबू’मध्ये माझ्या एकट्याच्या कथा नाहीत. समाजातल्या अनेकांच्या कथा आहेत. मानवी भावनांची रसमिसळ असलेल्या या कथांमधून माझ्या मुखवट्यासोबत कदाचित तुमचा मुखवटाही अलगद बाजूला होईल. तसं झालं तर तुम्ही जिंकला असं समजा आणि हे पुस्तक दुसऱ्या कुणाच्या तरी स्वाधीन करून टाका. या पुस्तकाचं काम झालेलं असेल.
Share
