Khatta Meetha+ Ha Ha Ha+Vinodavalli +Ala re ala Diwali Ank 2024 ( खट्टामिटा+हा हा हा+विनोदवल्ली+आला रे आला दिवाळी अंक 2024)
Khatta Meetha+ Ha Ha Ha+Vinodavalli +Ala re ala Diwali Ank 2024 ( खट्टामिटा+हा हा हा+विनोदवल्ली+आला रे आला दिवाळी अंक 2024)
Couldn't load pickup availability
# खट्टामिठ्ठा #
वाचकहो, 'खट्टामिठ्ठा' हा अंक खरोखरच विविध विषयांच्या लेखांनी 'ए टू झेड' इन वन' असं म्हटलं तरी हरकत नाही. आपणा सर्वांचा घर हा एक 'वीक पॉईंट' असतो. आपण ज्या घरात राहतो ते घर नुसतेच चार भिंतींचे नसावे. घर छोटे आहे की मोठे आहे, बंगला आहे की फ्लॅट आहे याला महत्व नाही पण जसे कसे आहे ते आपापल्या कुवतीप्रमाणे सुशोभित, स्वच्छ, प्रदुषणमुक्त, सजावट केलेले, मन प्रसन्न करणारे असावे. घरात घराला 'घरपण' देणारी माणसे त्यात असावीत. मग ते नवरा बायको असोत नाहीतर सासू सून, नाहीतर लहान मुले. अशा दृष्टिनेच 'खट्टामिष्ठ्ठा' मध्ये लेख आहेत. ज्यामध्ये घरातील हॉल, बेडरुम, स्वयंपाकघरातील सजावट कशी असावी, घरासमोरची बाग, बाल्कनीची निगा कशी राखावी ? घरातील प्रत्येक वस्तूची स्वच्छता कशी करावी ? उदा. घरातील भांडी, वॉशबेसिन, फ्रीज इ. घरात अडगळ का नसावी? याबद्दलचे विचारही मांडले आहेत.
# हा हा हा .. #
हा हा हा ४२ वा विनोदी दिवाळी अंक आहे अतिशय उत्तम प्रकारे विनोदी कथा , कादंबरी चे विविध विषय ह्या अंका मध्ये मांडले आहे.
# विनोदवल्ली #
विनोद आपल्या वाचनात नेहमीच असावेत. ते वाचण्याने मन सुखावून जाते. विनोद वाचावेत, त्यांचा आनंद मनमुराद घ्यावा, खळखळून हसावे. 'विनोद' ही एक शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्याची गुरुकिल्लीच आहे म्हणा ना. विनोद शब्दच असा आहे की आपल्या मैनाला सुखावून जातो. मनाला आनंद देतो.
'विनोद' विश्व पैसाही मिळवून देते. सिनेसृष्टित विनोदाचे बादशहा अनेक आहेत. मिमिक्रीचे प्रोग्रॅम करणारेही खूप जणं आहेत. अशा कार्यक्रमांवर त्यांनी भरपूर पैसा मिळवला आहे. त्यांच्या कार्यक्रमांना अफाट गर्दी होते याचे कारण नक्कीच विनोद ऐकून मन प्रसन्न होते हेच असावे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या नटांनी तर विनोदी भूमिका करुन प्रसिध्दी आणि पैसाही भरपूर मिळवला
# आला रे आला #
अनेक विनोदी कथांचं 'आला रे आला' हे मासिक सर्वांना आवडणारे आणि मनोरंजन करणारे असेच आहे. या अंकात .. घात, अखेर प्रतिक्षा संपली, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, लाख पोशिंदा राजा, हे ट्रॅपिंग कशासाठी?, निरभ्र, जित फक्त असते माझीच!, मस्करी, सुलभा, निकाल बारावीचा अशा एक ना अनेक विनोदी कथा आहेत. या कथांमध्ये सामाजिक, राजकीय, कौटुंबिक असे विविध विषय हाताळलेले आहेत. अशा विविध विषयांवरच्या विनोदी कथा वाचून फक्त मैनोरंजनच होईल असे नाही तर त्यातून कुटुंबात, समाजात कसे वागावे आणि कसे वागू नये याची सुध्दा थोडी
Share



