Khandyavarche Stars By Gajanan Rajmane (खांद्यावरचे स्टार्स )
Khandyavarche Stars By Gajanan Rajmane (खांद्यावरचे स्टार्स )
Couldn't load pickup availability
नक्षलग्रस्त प्रदेशात बऱ्याच कालावधीकरिता आपले पोलीस-कर्तव्य बजावणाऱ्या गजानन राजमाने यांच्या अनेक चित्तथरारक अशा कार्यानुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. समोर आलेले गुन्हेगार, अन्यायग्रस्त माणसे, आरोपी अशा सगळ्यांकडेच सर्वप्रथम माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन हे पुस्तक देते.
गुन्हा करण्यामागील काहीएक अपरिहार्यता व्यक्तीला गुन्हेगार बनवत असते. गजानन राजमाने यांनी आपल्या आजवरच्या पोलीस-प्रशासकीय सेवेत गुन्हेगारांच्या अशा अपरिहार्यता समजून घेऊन, त्यावर परिणामकारक उपाय योजून त्यांतील अनेकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्याचं काम केलं आहे. धर्म-जात यापलीकडे जाऊन त्यांनी बाळगलेला हा मानवीय विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे आणि यातील प्रत्येक प्रकरण वाचताना त्याची प्रचिती येते. त्यामुळे पोलीस सेवेत येऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींकरिता हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आहे.
Share
