Keshavsutanchi Khandit Kavita By Vasant Keshav Patil (केशवसुतांची खंडित कविता)
Keshavsutanchi Khandit Kavita By Vasant Keshav Patil (केशवसुतांची खंडित कविता)
Couldn't load pickup availability
एळाद्या ग्रंथाला ब्लर्ब किंवा पाठराखण लिहिण्याची (म्हणजे लिहून घेण्याची किंवा लिहून देण्याची) प्रशंसनीय प्रथा तशी सतातन आहे. मलपृष्ठावरील मजकुरात ग्रंथाचे मर्म वा वर्म बहुधा थोर्थोर वडीलधारी मंडळी लिहीत आली आहेत. अर्थात् डोळे झाकून वगैरे कारण उतारवयात अशा मंडळींचे चर्मचक्षू आणि अंतश्चक्षूही अधू झालेले असतात. ईश्वरेच्छेपुढे कुणाचे काय चालते। आणखी एक असे की ही मंडळी साठीच्या सत्तरीच्या बांधांवर डुगडुगत उभी असतात. अंगावरील धडुतांचेही त्यांना धड भान नसते. आपण काय बोलतो, लिहितो हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशा वेळी त्यांपैकी कुणाच्याही गळ्यात पडून ब्लर्बसाठी गळ घालणे हा अमानुष अपराध आहे, असे वाटते. यातून मुक्त होण्यासाठी खरे तर मलपृष्ठ कोरेच असावे असे आमचे प्रच्छन्न मत आहे. पण परंपरेची कास न सोडणाऱ्या आमच्या अभिजात स्थूलबुद्धी सुस्वभावामुळे आपणच काहीतरी गरगटणे हेच आमचे नियत कर्तव्य ठरत नाही काय । कर्तव्याला जागण्याच्या अंतःस्फूर्त प्रेरणेने आम्हीच हा मजकूर गिचबिडला आहे. आम्हाला तरी गोड वाटतो आहे. तुम्हाला तो तसा वाटला नाही तर तो तुमचा इंद्रियदोष. सहज मनात येते की हयातभर संशोधनादीच्या खातवड्यात अहर्निश गाडून घेतल्यामुळे आम्ही जणू अपृष्ठवंशीय प्राणिमात्रात स्थित्यंतरित झालो आहोत; तेव्हा ज्याला पाठच नाही, त्याची पाठराखण कसली व कशासाठी ! कुणाला काही सांगण्यात हशील नाही. आमची पाठ थोपटून आम्हाला तोंडघशी पाडणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कुणा अनामिकाला आमची पाठ थोपटण्याची संधी आम्ही कधी दिली नाही. तेव्हा आमची पाठ म्हटल्यावर ती आम्हीच का नाही थोपटणार !