Kavyalochana By Sudhir Rasal (काव्यालोचना)
Kavyalochana By Sudhir Rasal (काव्यालोचना)
Couldn't load pickup availability
सुधीर रसाळांच्या या लेखसंग्रहात काव्यासंबंधीचे काही सैद्धांतिक लेख समाविष्ट केले असून काही लेख कवींच्या काव्यावरचे आहेत. यातील सैद्धांतिक लेख काव्य, कविता, कवितेचे मूल्य अशा काव्यासंबधीच्या पायाभूत संकल्पनांसंबंधीचे आहेत. कविता दुर्बोध का व कधी बनते, आधुनिक कवितेतील दुर्बोधतेमागची कारणे आणि तिचे स्वरूप, कवितेतील व्याज दुर्बोधता या संबंधीची चर्चाही या संग्रहातील एका लेखात करण्यात आली आहे. या लेखसंग्रहात अलीकडच्या अरुण कोलटकर, चंद्रकांत पाटील, अनुराधा पाटील यांच्या काव्यवैशिष्ट्यांचा वेध घेणारे लेख समाविष्ट झालेले आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोविंदाग्रज आणि बालकवी या दोन अभिजात कर्वीच्या कवितेचे एका नव्या दृष्टिकोनातून विश्लेषण आणि पुनर्मूल्यांकन करणारे लेख, तसेच प्रचलित काव्यपरंपरेपेक्षा वेगळ्या प्रकारची काव्यनिर्मिती करणाऱ्या द. भा. धामणस्करांच्या कवितेची चिकित्सा करणारा लेख, यांमुळे हा लेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. मराठी काव्यसमीक्षेत शहाणपणाच्या कवितेचे स्वरूप प्रथमच स्पष्ट करून अलीकडे लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या ‘बोलगाणी’ या शहाणपणाच्या कवितेची मीमांसा करणाऱ्या लेखामुळे या संग्रहाचे मूल्य अधिकच वाढलेले आहे. या मोजक्या लेखांमुळे विसाव्या शतकातील काव्यपरंपरेचा पट वाचकांसमोर उभा राहतो. हा लेखसंग्रह काव्याच्या अभ्यासकांना आणि काव्यरसिकांना निश्चितच उपयुक्त होणार आहे.