Kavyajyoti - काव्यज्योती | By V. S. Khandekar
Kavyajyoti - काव्यज्योती | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
‘...शिक्षक आणि पालक या दोन्ही नात्यांनी मला नेहमी असे वाटत आले आहे, की दहा ते पंधरा वर्षांच्या मुलामुलीच्या मनांवर कोमल कल्पनांचे आणि उदात्त भावनांचे जेवढे संस्कार करता येतील, तेवढे समाजाने आवर्जून केले पाहिजेत. जीवनधर्माची जाणीव अंतःकरणात लहानपणी न मुरल्यामुळे आजचे जग शांतीसुखाला पारखे झाले आहे. ती दुर्लभ शांती सामान्य माणसांच्या अंतःकरणातील मानवतेची भक्ती पाहूनच पुन्हा या जगात अवतार घेईल. अशी भक्ती लहान मुलांच्या मनात निर्माण करण्याची साधने दोनच आहेत उत्कृष्ट आणि उदात्त काव्य; व रामायण, महाभारत, बायबल यांसारखे ग्रंथ! या संग्रहातल्या प्रत्येक कवितेत असे काही तरी अंतःकरणाला विशाल करणारे, मनावरली काजळी झाडून टाकणारे, आत्म्याच्या सुप्त सामथ्र्याला आवाहन देणारे भरले आहे, असे वाचकांना आढळून येईल. अंधारात तारका पाहून मनाला धीर येतो ना ? जीवनमार्गावरल्या प्रवाशाला काव्यज्योती’तल्या अनेक कविता तशाच वाटतील.’