Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
'कथामंजिरी' हा कथासंग्रह घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते आहे. माझ्या आजवरच्या लेखन प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा! 'कथा' हा माझा आवडता रचनाबंध ! वाचकांनीही माझ्या कथांना भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे माझ्याकडून कथालेखन जोमाने होऊ शकलं. कथालेखन आनंदाचं असलं तरी ते कष्टसाध्य असतं. दमवणारं असतं. रचना कौशल्याची कसोटी पाहणारं असतं. कथेचा पैस तसा मर्यादित असतो. प्रत्येक कथा लेखकाला दमवणारी असते. सर्व कथांच्या मागण्या वेगळ्या, रचना वेगळ्या ! त्या लिहीत असताना सतत असलेला अस्वस्थपणा हे सर्व कथाकारांचं भागधेय असतं. वाचकांसमोर हे थोड्या विस्ताराने मांडावंसं वाटलं कारण आयुष्याच्या आणि लेखनप्रवासाच्या या टप्प्यानंतर आता पुढला प्रवास किती आहे हे सांगणं कठीण आहे. लेखक समाधानी तर कधीच नसतो अजून चांगलं लिहिता यावं आणि लिहिलं ते अधिक सुक्ष्मपणे तरलतेने व्यक्त करता आलं असतं ही भावना मनात सतत असतेच. तरीही माझ्या एकंदर लेखन संदर्भात मागे वळून पाहताना बरंच काही गाठीशी बांधता आल्याची भावना निश्चितच सुखद आहे. --- माधवी कुंटे
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books