Skip to product information
1 of 1

Kashmirchya Lokakatha By Durga Bhagwat (काश्मीरच्या लोककथा)

Kashmirchya Lokakatha By Durga Bhagwat (काश्मीरच्या लोककथा)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

रेव्हरंड जे. हिंटन नोल्स (Knowles) है पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिद्ध असे ब्रिटिश मिशनरी होते. जिथे काम करायचे, आपले धर्मतत्त्व लोकांना पटवून द्यायचे, त्या लोकांची भाषा, चालीरीती वगैरेचे ज्ञान धर्मप्रचारकाला आवश्यक असते. ही गोष्ट नोल्स यांना चांगलीच माहीत होती. संस्कृतीचे ते जाणकार होते. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे याची जाण त्यांना होती. काश्मिरी म्हणींचा कोश त्यांनी प्रथम तयार केला. 1886 च्या सुमारास A Dictionary of Kashmiri Proverbs and Saying या नावाने तो प्रसिद्ध आहे. दूरुबनर आणि कंपनीने तो लंडनला प्रकाशित केला. लोकसाहित्याचे जाणकार म्हणून या कोशामुळे ते प्रसिद्धीला आले. रे. नोल्स यांचा Folks-Tales of Kashmir हा दुसरा ग्रंथ 1888 साली टूरुबनर आणि कंपनीनेच प्रकाशित केला. त्याचेच भाषांतर मी केले आहे. Indian Antiquary या अतिशय पांडित्यपूर्ण आणि जगभर आदरास पात्र झालेल्या मासिकात यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत. माझे लक्ष प्रथम त्यांनीच वेधून घेतले. मेरी फ्रियर नंतर जे पाच-सात लोककथा-संग्राहक पाश्चात्त्य लोकसाहित्याच्या अभ्यास प्रथेत भारतीय लोककथाकारांचे अग्रदूत म्हणून गणले जातात त्यापैकी नोल्स हे एक आहेत. भारतीय लोककथांचा सर्वकष अभ्यास अद्याप झालेला नाही. भारतीय लोककथांचे संग्रह, त्यातल्या त्यात आता दुर्मिळ झालेले संग्रह भारतीय भाषांत अनुवाद होऊन पुढे आले तरच हा अभ्यास आता शक्य आहे. या हेतूने मी हा अनुवाद केला आहे.

View full details