Kasav Yeta Ghara By Matilda D'silva (कासव येता घरा)
Kasav Yeta Ghara By Matilda D'silva (कासव येता घरा)
Couldn't load pickup availability
सहज, साधं, सोपं, जसं घडतंय तसं लिहिणारी म्हणून मॅटिल्डा डिसिल्वा प्रसिद्ध आहे. गतवर्षी 'निवांत' नावाचा तिचा कथासंग्रह प्रकाशित झाला. तो प्रौढांसाठी आहे आणि आता तिचा लहानग्यांसाठी 'कासव येता घरा....' हा कथासंग्रह प्रकाशित होतोय. गद्य लेखनातील ही तिची भरारी म्हणावी लागेल. कारण लहानग्यांसाठी त्यांच्या पातळीवरून जाऊन लिहिणे हे फार कठीण! असं असताना बालकांसाठी अगदी सोप्या भाषेत त्यांचेच भावविश्व उलगडून ती दाखवते हे विशेष! म्हणजे आईने आपल्या छकुल्यांना एखादी गोष्ट सांगावी किंवा डाळिंबाचे टरफल हळुवार सोलत त्यातील टपोरे दाणे न टिपता अलगद काढून बालकाच्या तोंडात नेमकेपणाने घालावेत, इतकी सहजता तिच्या लेखनात आहे. डाळिंबाचं टरफल किती कठीण आणि ते पाणीदार दाणे नाकात न जाता तोंडात घालण्यात आईच्या हृदयाचीच ममता आणि शिताफी लागते. असे होताना आईचे हात तर डाळिंबाने रंगतातच पण डाळींब खाताना बालकाच्या ओठावरील लाली पाहतानाही आईला अतीव आनंद होत असतो. इतक्या सहज साधेपणाने मॅटिल्डा आपल्या लेखणीतून बालकांना मूल्यांचे दाणे भरवीत असते.
Share
