Kanhoji Angre By Manohar Malgaonkar, P L Deshpande(Translators) (कान्होजी आंग्रे)
Kanhoji Angre By Manohar Malgaonkar, P L Deshpande(Translators) (कान्होजी आंग्रे)
Couldn't load pickup availability
कान्होजी आंग्रे...मराठा आरमाराचे अनभिषिक्त सम्राट...छत्रपती संभाजींपासून ते छत्रपती शाहूंपर्यंत भोसले घराण्याचे निष्ठावंत सेवक...पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्दी, मोगल या शत्रूंना बिनतोड उत्तर देणारे पराक्रमी सरखेल...सगळ्याच जहाजांना समुद्रात जाण्यासाठी ‘दस्तक` हा परवाना घ्यायला भाग पाडणारे आरमारप्रमुख...‘सरखेल वजारत मा आब` या किताबाचे मानकरी... छत्रपती राजाराम, त्यांच्यानंतर ताराबाईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे इमानदार सेवक...नंतर बाळाजी विश्वनाथ यांच्या सांगण्यावरून शाहूच्या पायावरही निष्ठा वाहणारे निष्ठावंत...तर असे हे कान्होजी आंग्रे...त्यांचा पराक्रम, त्यांचा मुत्सद्दीपणा, सागरी किल्ल्यांचे संरक्षण करीत समुद्र मार्गे होणारं परकीयांचं आक्रमण थोपवण्याचं त्यांनी केलेलं अजोड कार्य याची ही अपूर्व गाथा मनोहर माळगोनकरांच्या लेखणीतून उतरलेली आणि पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचा अनुवादरूपी परिसस्पर्श झालेली.