Kanakhara Netrutvasathi Shivniti Pratekasathi By Rahul Nalawade
Kanakhara Netrutvasathi Shivniti Pratekasathi By Rahul Nalawade
'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणजे विश्वबंधुत्व, विश्वकल्याण हे शब्द प्रत्यक्षात उतरवून समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही लोककल्याणकारी तत्त्व स्वराज्यात रुजविणारा कर्तृत्ववान राजा !
जिथे केवळ लोक होते, तिथे महाराजांनी आदर्श समाज निर्माण केला. जिथे केवळ भूमी होती, तिथे एक आदर्श राष्ट्र निर्माण केले... जिथे केवळ भावना होत्या, तिथे महाराजांनी राष्ट्रभावना निर्माण केल्या, जिथे मनाने खचलेली तरुणाई होती, त्यातूनच स्वराज्यासाठी जबरदस्त लढवय्ये मावळे निर्माण केले...
आणि जिथे केवळ एक गुलामांचे छोटे राज्य होते, तिथे लढवय्या मावळ्यांचे बलाढ्य वैभवशाली स्वराज्य निर्माण केले... पण...! हे सगळं महाराजांना शक्य झाले ते केवळ उत्तम प्रशासकीय दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध कारभारानेच !
आणि म्हणूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेतृत्वापर्यंत.. छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत... युवकांपासून ते अभ्यासकांपर्यंत... गृहिणींपासून ते वर्किंग वूमनपर्यंत...
अशा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्वराज्यनिर्मिती मागची छत्रपती शिवाजी महाराजांची हीच 'शिवनीती' समजून घ्यायला हवी.
सर्वांच्याच नेतृत्वगुणाला अधिक कणखर करणारं शिवनीती' तील हे सार प्रत्येकासाठी सादर...