Kam Karnyache Niyam By Brian Tracy, Pratima Bhand (Translator)
Kam Karnyache Niyam By Brian Tracy, Pratima Bhand (Translator)
Couldn't load pickup availability
सर्वांत महत्त्वाची कामं करायला शिका - आजच!
आपल्याकडे "करणे बाकी" यादीतील सर्व कामं करण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो आणि भविष्यातदेखील नसेल. यशस्वी व्यक्ती सर्वच काम स्वतः करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते सर्वांत महत्त्वाच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे कसब शिकतात आणि चिकाटीने ती कामे पूर्ण करतात.
एक जुनी म्हण आहे - जर तुम्ही दररोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकलात, तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचे समाधान राहील की, तुमच्यासोबत त्या दिवशी यापेक्षा अजून वाईट काही होऊ शकत नाही. "बेडूक गिळणे" याची तुलना दिवसातील सर्वांत आव्हानात्मक कामाशी करा - ज्या कामामध्ये तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वांत जास्त असेल; पण कदाचित त्याचाच तुमच्या आयुष्यावर सर्वांत जास्त सकारात्मक प्रभाव पडेल. हे पुस्तक सांगेल की तुमची सर्वांत महत्त्वाची कामे कशी संपवावीत आणि प्रत्येक दिवसाची आखणी कशी करावी. याने तुम्ही फक्त वेगाने कामं करणेच शिकणार नाहीत तर त्याबरोबरच योग्य तीच कामे करायला शिकाल.
Share
