Kalchakra Punyache By Saket Dev (कालचक्र पुण्याचे)
Kalchakra Punyache By Saket Dev (कालचक्र पुण्याचे)
Couldn't load pickup availability
लेखक साकेत देव स्वतः इतिहास अभ्यासक असल्याने त्यांनी ह्या सर्व कथा ऐतिहासिक सत्याच्या जास्तीतजास्त जवळ जातील, याची काळजी घेतली आहे. अनेक इतिहास विषयक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून, त्याची सत्यता तपासून मग ती माहिती काल्पनिक कथेत पेरायचा अनोखा प्रयत्न सदर पुस्तकात केला गेला आहे. मला वाटते ही पुस्तकाची सर्वात जमेची बाजू आहे. पुस्तकातील सर्वच कथा अप्रतिम झाल्या आहेत. परंतु मला एका कथेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. 'बालगंधर्व' हे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक श्रेष्ठ कलावंत. बालगंधर्वांचे वास्तव्य बरेच वर्ष पुण्यात होतं. पण ते शहरातील कोणत्या भागात राहत, हे बहुसंख्य पुणेकरांना माहिती नसेल, अगदी मलाही माहिती नव्हतं. ‘बालगंधर्वांचे घर' या कथेतून त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्या महान कलाकाराला अशा प्रकारे दिलेली आदरांजली बघून समाधान वाटलं. खरं सांगायचं तर पुस्तक लिहिणं अजिबात सोपं काम नाही. स्वतःच्या हौसेखातर आपला कामधंदा सांभाळून त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागतात. रंजक कथेतून इतिहास समोर ठेवण्यात माझे मित्र साकेत देव हे यशस्वी झाले आहेत, असे मला वाटते. व्यक्तिशः मला हा नवीन प्रयोग आवडलेला आहे. कथा विविधांगी असून वाचकांना त्या खिळवून ठेवतील अशी मला खात्री आहे. पुस्तक अणि पुढील लेखन प्रवासाकरिता लेखकांना अनेकानेक शुभेच्छा.
Share
