Kalchakra By Mayur Shree Belokar
Kalchakra By Mayur Shree Belokar
Couldn't load pickup availability
आपल्या देशात भूत या विषयावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटापैकी, बहुतांश चित्रपटांच्या शेवटी त्या भुताची भेट होते, तो हे सारं का करतो, कधीपासून करतो, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि चित्रपट संपतो. त्या मागे असंख्य कारणं असली तरी एक कारण खूप सामान्य आहे ते म्हणे प्रेमभंग, त्याचा कुणी खून करतो अथवा तो स्वतःला संपवतो आणि मेल्यावर मग भूत होऊन तो सगळ्यांच्या सूड घेण्याच्या उद्देशाने मागे लागतो. अश्या थोड्याफार चालणाऱ्या चित्रपटांच्या त्या कथा असतात. पण मला ह्यांहून थोडं वेगळं करून पहायचं होतं. तोच एक प्रयत्न आज मी तुमच्या समोर ठेऊ इच्छित आहे. तसे पहायला गेले तर प्रत्येक कथेला एक नायक आणि एक खलनायक असतोच, पण ह्या कथेत काहीतरी वेगळे घडतेय. अनेकदा तर ती पात्र स्वप्नात येऊन त्यांच्या सोबत काय घडवायचं आहे हे सांगून जायचे. आणि माझा पुढे काय लिहू हा प्रश्न सुटायचा .
Share
