Kagud By Ganesh Avate (कागूद)
Kagud By Ganesh Avate (कागूद)
Couldn't load pickup availability
अस्सल बोलीभाषेसह येणारे वर्णन आणि आळा सुटलेल्या पेंढीसारखं जीवन जगणार्या माणसाचं चित्रण या कथासंग्रहातील पानापानांतून दिसून येते. शेतीशिष्ठ मराठी संस्कृतीचा कणा असलेला शेतकरी जीवनाचे मनोविश्लेषणात्मक चित्रण त्यांच्या कथेतून आले आहे. त्यांच्या कथा त्या त्या पात्राने प्रत्यक्ष जगणे अनुभवल्यासारख्या जिवंत वाटतात. कमालीच्या निरागस व संयमी शैलीत ग्रामीण वास्तव्य आधुनिकता यांच्या कचाट्यात सापडलेल्या भोळ्या, दैववादी, अश्राप लोकजीवनाचे वर्णन त्यांनी केलेले दिसते.
लोकभाषेतून आविष्कृत झालेल्या या कथेत खेड्यातील स्त्री, गुराखी, सुशिक्षित बेकार, विद्यार्थी आणि शेतकरी या समाज घटकांची जगण्याची धडपड चित्रित झालेली आहे. वर्तमानाशी नांत सांगणार्या या कथा खेड्यातील वास्तव जसेच्या तसे डोळ्यांपुढे उभ्या करतात.
भयावह दारिद्य्र, कर्जबाजारीपणा, असहायता, कोंडमारा, हताशवृत्ती हे बदलत्या खेड्यांचे वास्तविक संदर्भ हुबेहुब दृग्गोचर झाले आहेत. बहुजन समाजातल्या विशेषत: मराठा समाजातील नवे ताण, नवे नाट्य, नवे जीवन आणि बदलती मानसिकता याचा वेध गणेश आवटे यांनी समर्थपणे घेतला आहे.
‘ग्रामीण स्त्रीचे वास्तव चित्रण करण्यामध्ये गणेश आवटे शंकर पाटलांच्या एक पाय पुढे गेले आहेत.’ हे डॉ. आनंद यादव यांचं म्हणणं सार्थ वाटते. आशयाशी प्रामाणिक राहणारी गणेश आवटे यांची भाषा सरळ, साधी तरीपण सतेज आणि टवटववीत आहे.
Share
