Kagdi Ghode By S. L. Khutwad (कागदी घोडे)
Kagdi Ghode By S. L. Khutwad (कागदी घोडे)
Couldn't load pickup availability
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असं म्हणतात. सरकारी कामकाज कशा पद्धतीने चालते, यावर यातून प्रकाशझोत पडतो. सर्वसामान्य माणूस विविध सरकारी कार्यालये, बँक, महापालिका, पोलीस ठाणे, महावितरण इथे गेल्यानंतर, तिथे त्याला कशा प्रकारची वागणूक मिळते, अधिकारी-कर्मचारी कशा पद्धतीने कागदी घोडे नाचवतात, अटी आणि नियमांच्या जंजाळात कामे कशी अडकवून ठेवली जातात, खेटे मारायला लावून कशी दमछाक करतात, फाइल पुढे सरकवण्यासाठी चिरीमिरी कशी द्यावी लागते, याचा अनुभव सर्वसामान्य माणूस कसा घेत असतो याचं चित्रण लेखक हुबेहूब करतो. इरसाल, बेरकी पात्रे या पुस्तकात ठिकठिकाणी आहेत. त्यांच्याकडून काम करून घेण्याच्या नादात सर्वसामान्य माणसाची उडणारी त्रेधातिरपीट इथे रंगवली आहे. त्याचबरोबर उपहास, उपरोध आणि अतिशयोक्तीचा वापर लेखकाने ज्या पद्धतीने केला आहे, त्यामुळे ते कागदी घोडे आपल्या आजूबाजूला आहेत का, असा प्रश्न नकळत मनात येतो.
Share
