Kadevar Ani Itar Katha By Mahesh Sovani (कडेवर आणि इतर कथा)
Kadevar Ani Itar Katha By Mahesh Sovani (कडेवर आणि इतर कथा)
Couldn't load pickup availability
जेव्हा जेव्हा ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी अंधश्रद्धा तेजीत येते तेव्हा तेव्हा त्याचे ‘निर्मूलन’ करण्यासाठी काळाच्या पटावर काही लेखक त्यांची लेखणी सरसावून पुढे येतात आणि या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यास हातभार लावतात. कोविडनंतर ज्यांनी लेखन सुरू केलं आणि अल्पावधित ज्यांच्या लेखनाचा परीघ विस्तारून साहित्यक्षेत्र कवेत घ्यायची धमक ठेवतो, अशा अपवादात्मक लेखकांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे महेश सोवनी.
कथालेखन सुरू केल्यानंतर मराठीतील महत्त्वाच्या दिवाळी अंकांनी, मासिकांनी सोवनी यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि हे रसायन वेगळेच आहे, हे लक्षात आले. स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करण्याची क्षमता असणारे लेखक विरळा झाले असताना महेश सोवनी यांच्या कथेची वाट पाहणारे वाचक जागोजागी दिसू लागले.
पहिले पुस्तक येण्याच्या आधीच यातील ‘कडेवर’ या शीर्षक कथेचा इंग्रजी अनुवाद करून साहित्य अकादमीने तो सन्मानपूर्वक प्रकाशित केला. एक कथा गुजरातीत अनुवादित झाली. इतकेच नाही तर काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनीही या कथा प्रकाशित केल्या. जीवनमूल्यांचे दर्शन घडविणाऱ्या, वाचकांची उमेद वाढविणाऱ्या आणि तत्त्वज्ञानाची किनार असूनही वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या या कथा आपणास वाचनानंद देतील, हे नक्की!
Share
