Ka Re Bhulalasi By V.P.Kale (का रे भुललासी)
Ka Re Bhulalasi By V.P.Kale (का रे भुललासी)
Regular price
Rs. 145.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 145.00
Unit price
/
per
का रे भुललासी` हा वपुंचा कथासंग्रह `वरलिया रंगां`चा भेद करून माणसाच्या खया रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुखदु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसयावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की! वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत.