Jyotish Vidnyan By osho (ज्योतिष विज्ञान)
Jyotish Vidnyan By osho (ज्योतिष विज्ञान)
Couldn't load pickup availability
ज्योतिषाचे तीन भाग आहेत.
एक आहे अनिवार्य भाग. त्यामध्ये तसूभरही फरक होत नाही. समजून घेण्यास तो सर्वांत कठीण आहे. त्याच्या बाह्य परिघात गैर अनिवार्य भाग आहे. त्यामध्ये सर्व बदल होऊ शकतात, आपल्याला मात्र त्याच भागाविषयी जास्त उत्सुकता असते. या दोन भागांच्या मधील क्षेत्रात अर्ध अनिवार्य हा तिसरा भाग आहे. तो समजून घेतल्याने त्यात बदल होऊ शकतात, न घेतल्यास बदल होत नाहीत. असे हे तीन भाग आहेत. इसेन्शियल, जो अतिशय सखोल आहे, अनिवार्य आहे, ज्यात काहीच बदल होऊ शकत नाही. तो समजल्यानंतर त्याचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नसते. धर्मांनी या अनिवार्य गोष्टीचा किंवा सत्याचा शोध घेण्यासाठीच ज्योतिषशास्त्र आविष्कारित केले. त्याच्याकडे वळले. यानंतर दुसरा भाग आहे. सेमी-इसेन्शियल, अर्ध अनिवार्य. जर त्याविषयी समजले तर बदल होऊ शकतो, नाही जाणून घेतले तर बदलता येणार नाही. अज्ञानात राहाल तर जे व्हायचे तेच होईल. ज्ञान झाले तर पर्याय आहेत. बदल होऊ शकतात आणि तिसरा भाग सर्वांत वरचा स्तर आहे नॉन-इसेन्शियल, गैर अनिवार्य. त्यात काहीच आवश्यक नाही. सर्व संयोगिक आहे.
- ओशो
पुस्तकाचे काही मुख्य विषय :
ज्योतिष हे विज्ञान आहे का?
ज्योतिषाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे?
आजच्या संदर्भात ज्योतिष
ज्योतिष एक अंधविश्वास आहे का?
Share
