Junglee Mi Bapu By S D Mahajan
Junglee Mi Bapu By S D Mahajan
Couldn't load pickup availability
त्या काळात मी कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या सदाहरित घनदाट जंगलापासून ते महाराष्ट्रातल्या निमसदाहरित व पानझडी जंगलापर्यंत, त्याचप्रमाणे सागरतीरावरील खारफुटी जंगलापासून सौराष्ट्र, कच्छ व पश्चिम राजस्थानच्या कोरड्या गवताळ कुरणांपर्यंत आणि वाळवंटातही सर्वत्र संचार केला. बराच प्रवास रेल्वेने, बसने; पण कित्येक ठिकाणी जीप किंवा अशाच कुठल्यातरी खाजगी वाहनातून, कधी बैलगाडीतून, सायकलवर आणि शेवटी जंगलात पोचल्यावर तर पायी चालतच केला. केरळमध्ये हत्तीवरून तर पाकिस्तान सीमेवर "उंटावरचा शहाणा" बनून सुद्धा भ्रमंती झाली! सरकारी बंगल्यात, वनविश्रामगृहात, कचित हॉटेलमध्ये , वनाधिकाऱ्यांच्या घरी-इतकंच काय, पण आदिवासी पाड्यात आणि चक्क जंगलात तंबूमध्ये तसेच मंदिरातही मुक्काम केला दोन-तीन वेळा तर मला आठवतय, कुठे मुक्काम असा केलाच नाही। रात्रभर ट्रेनमध्ये प्रवासात, नंतर दिवसभर काम, पुन्हा रात्रभर ट्रेनने पुढचा आणि शेवटचा परतीचा प्रवास.