Jidda Asavi Tar Ashi By N. Raghuraman (जिद्द असावी तर अशी)
Jidda Asavi Tar Ashi By N. Raghuraman (जिद्द असावी तर अशी)
Couldn't load pickup availability
मॅनेजमेंट...
आजच्या युगातला एक महत्त्वाचा शब्द...
एकाच शब्दाचे किती वेगवेगळे कंगोरे असतात ना...?
अगदी कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये करिअर करण्यापासून ते गृहिणीने घर सांभाळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंटची आवर्जून मदत होते.
प्रत्येक माणसाची आपापल्या आयुष्यात आपली अशी काही स्वप्नं असतात; परंतु ती पूर्ण करायला अनुकूल परिस्थिती असतेच असं नाही.
जगात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं तर त्याचवेळी सुख पायाशी लोळण घेत असताना करिअरच्या, व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याचं धारिष्ट्य अनेकांनी दाखवले. मुख्य म्हणजे त्यात यशही मिळवलं.
या पुस्तकातून तुम्हाला तुमच्यासारखीच सर्वसामान्य माणसं भेटतील. पण त्यांचं वैशिष्ट्य हेच की आपल्या जगण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मॅनेजमेंटची सूत्रंच आपल्यासमोर उभी केली.
प्रख्यात मॅनेजमेंट गुरू एन. रघुरामन यांनी प्रेरणेचा महास्रोतच या सार्या व्यक्तींच्या रूपात वाचकांसमोर खुला केला आहे.
हे पुस्तक कोणासाठी?
तर आपल्या स्वप्नांची दुनिया उभी करू पाहणार्या अगदी नवतरुणांपासून ते निवृत्ती घेतलेल्या ‘नव’तरुणांपर्यंत सर्वांसाठीच...!
Share
