Skip to product information
1 of 1

Jambavali Te Aambivali By Vitthal Ray Bhat (जांबवली ते आंबिवली - विठ्ठल राय भट)

Jambavali Te Aambivali By Vitthal Ray Bhat (जांबवली ते आंबिवली - विठ्ठल राय भट)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 180.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

"नोकरनामा" हे आत्मचरित्रात्मक मालेतील पहिले पुष्प प्रकाशित होऊन काही महिने लोटले. वाचक व समीक्षक, नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांच्याकडून भरभरून प्रतिसाद लाभला. त्यामुळे हुरूप येऊन मी पुढील भाग, "जांबावली ते आंबिवली" लिहिण्याचा संकल्प केला.

"नोकरनाम्या"त मी केलेल्या नोकऱ्या व केलेले व्यवसाय यांच्याबाबत तपशीलाने लिहिलेले आहे. त्या पुस्तकात माझे कौटुंबिक जीवन तसेच सामाजिक क्षेत्रातील कामाचा उल्लेख नव्हता. ती कसर मी या पुस्तकात भरून काढलेली आहे.

हे पुस्तक लिहिताना लेखनिक म्हणून मला, श्री अनिरूद्ध राणे, कु. प्रियांका पांगरे, कु. प्रियांका चव्हाण कु. प्रिया कौरती व कु. सोनाली जाधव यांची भरीव मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तकाची मुद्रणप्रत अतिशय सुंदर व सुवाच्य अक्षरात लिहून दिल्याबद्दल कु. पुष्पा शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.

मुक्तांगण प्रकाशनाचे मालक व माझे मित्र श्री. राजू भानारकर यांनी प्रकाशनाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतल्यामुळे मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.

या पुस्तकाचा पुढील भाग "इये ग्रंथाचिये नगरी' या नावाने प्रकाशित होणार आहे

View full details