Jahirat Vishva By Vinod Jaitmahal (जाहिरात - विश्व )
Jahirat Vishva By Vinod Jaitmahal (जाहिरात - विश्व )
Couldn't load pickup availability
जाहिरातींमुळे व्यवसाय वाढतो आणि व्यवसायातून बाजार फुलतो. मानवी आयुष्याची संजीवनी म्हणजे बाजारपेठ. यातून मिळणार्या टॅक्सवरच सरकार चालते. सरकारी व खासगी नोकर्या निर्माण होतात. बाजारात भाषाही प्रवाही होतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्याने बाजारपेठेची व जाहिरातींची भाषा लवकर शिकून घेतली पाहिजे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आगमनामुळे जाहिरातक्षेत्रात मोठी क्रांती घडली. डिजिटल जाहिरातींचे महत्त्व वाढले.
जाहिरात ही कला आता केवळ वस्तू विकण्याचे साधन राहिले नाही. ब्रॅॅण्ड तयार करणे, ग्राहकांसोबत संवाद साधणे आणि मनोरंजनासोबतच सांस्कृतिक प्रभाव टाकण्याचे एक प्रभावी साधन म्हणजे जाहिरात, असे विशाल रूप तिने धारण केले आहे. त्यामुळे जाहिरात ही प्रभावी, भावनेला साद घालणारी व आकर्षक असायला हवी. जाहिरातीला पासष्टावी कला म्हटले जाते ते यासाठीच. या कलेचे तंत्र-मंत्र कोणते? आपली जाहिरात सर्वांत जास्त आकर्षक व प्रभावी कशी करावी? जाहिरात करताना काय करावे, काय करू नये? तांत्रिक व व्यावसायिक अचूकता कशी साधावी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. जाहिरात-विश्वात कल्पकतेने चमकण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच सज्ज करेल.
Share
