Jagprasiddha Mahila Shastradnya / Kalpana Chawla Combo Books
Jagprasiddha Mahila Shastradnya / Kalpana Chawla Combo Books
Couldn't load pickup availability
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कल्पना चावलाला मातीपेक्षाही ओढ होती ती अवकाशाची. स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणार्या कल्पनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रत्येक पाऊल त्याच दिशेने टाकले. अॅरोनिटिक इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर शिक्षणासाठी कल्पना अमेरिकेत गेली तेच मुळी स्वप्नांचे पंख लेवून.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले आणि जीवनसाथीही अमेरिकेचाच निवडला. अवकाशात जाण्याचे तिचे स्वप्न एकदा पूर्ण झाले; पण तेवढ्याने ती समाधानी झाली नाही. त्याच ओढीने पुन्हा एकदा ती कोलंबिया अंतराळयातून अंतराळ सफरीवर निघाली. ही सफरही यशस्वी झाली; पण...
अवकाशाची ओढ असलेली कल्पना अवकाशातच अंतर्धान पावली.
आकाशाइतकीच प्रेरणादायी असलेली अवकाशकन्येची कथा.
___________________________________________________________________________________________
प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. साहजिकच त्याचा महिलांना शिक्षणासाठी मिळणार्या संधी, पर्यायाने कामासाठी होणारी निवड यांच्यावरही प्रतिकूल परिणाम होत आला आहे. हा संघर्षाचा कालखंड फार खडतर होता हे वेगळं सांगायला नको.
मात्र संघर्षाचं हे वलय भेदून आपल्या जिद्द, चिकाटी आणि लखलखत्या कर्तृत्वानं अशा प्रतिकूल परिस्थितीवर काही महिला शास्त्रज्ञांनी खंबीरपणे मात केली आणि मानवी विकासाला नवी दिशा दिली.
वैज्ञानिक मनोवृत्तीचा प्रसार व्हावा आणि आजचे विद्यार्थी तसेच भविष्यातील शास्त्रज्ञांना या पुस्तकात समाविष्ट महिला शास्त्रज्ञांच्या दृढ इच्छाशक्ती आणि परिश्रमांतून प्रेरणा मिळावी, या विश्वासावरच हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे. आर्थिक अथवा इतर अडचणीदेखील महत्त्वाकांक्षा बाळगणार्या महिलांच्या यशात अडथळा आणू शकत नाहीत. सर्व महिला शास्त्रज्ञांचे संकलन करणे निश्चितच कठीण कार्य आहे. तरीही विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या महिला शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी परिचय या पुस्तकात देण्यात आलेला आहे.
विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तबगारीचे झेंडे रोवणार्या जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञांची ही वेधक चरित्रं.
Share
