Jagaycha Kasa | Rajeev Nandkar (जगायचं कसं । राजीव नंदकर)
Jagaycha Kasa | Rajeev Nandkar (जगायचं कसं । राजीव नंदकर)
Couldn't load pickup availability
जगायचं कसं
आजच्या या धावपळीच्या व सोशल मीडियाच्या भासमान जगात माणूस
त्याचं जगणं हरवून बसलाय. वाढत्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तव यांमध्ये
मोठं अंतर तयार झाल्याने त्याचं जगणं त्यालाच दिवसेंदिवस असह्य होतंय.
माहितीचा भडीमार आणि नाते-संबंधातील तणाव यामुळे तो वेळी-अवेळी
अस्वस्थ होतोय. स्वत:ला नक्की काय हवं हेच त्याला उमगणं आणि समजणं
बंद झालंय. त्यामुळे लख्ख अशा प्रकाशातही माणूस चाचपडतोय. याचं कारण
स्व-चा स्व-ला न लागलेला शोध. ‘मी’ या शब्दातून फक्त तुमचं बाह्य रूप
प्रकट होतं; तर ‘स्व’ तुमच्या अंर्तबाह्य स्वरूपाचा परिचय करून देत असतो.
‘मी’ म्हणजे तुमच्या नावाची व पदाची ओळख; तर ‘स्व’ म्हणजे तुमच्या
विचारांची आणि मूल्यांची ओळख. ज्यांनी ‘स्व’ जाणलं त्यांनी विश्व जाणलं.
हे समजून घ्यायचं तर हे पुस्तक वाचलचं पाहिजे. राजीव नंदकर यांनी त्यांच्या
स्वानुभवातून लिहिलेले ‘जगायचं कसं’! हे पुस्तक तुम्हाला तुमच्या स्व-चा
शोध घेऊन साधं, सोपं, सरळ, सुटसुटीत, सुकर, सुखी व समाधानी आयुष्य
कसं जगायचं याबाबत मार्गदर्शन करतं.
Share
