Jaganyatle Kajave By Bhagyashree Pethkar ( जगण्यातले काजवे )
Jaganyatle Kajave By Bhagyashree Pethkar ( जगण्यातले काजवे )
Couldn't load pickup availability
आयुष्य हे सुखदुः खांच्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्रासारखे असते. या सुख-दुःखांपासून कोणीही फारसा दूर नसतो. धनवंतांच्या आणि सर्वसत्ताधाऱ्यांच्या वाट्यालाही दुःखे येतात आणि दरिद्री व वंचितांच्या वाट्यालाही आनंद व हास्य येत असते. खरी बाब हे अनुभव घेणाऱ्याचे मन किती संवेदनशील आणि आत्मीयतेने भरले असते ही आहे. अशी मने ज्यांना लाभतात ती माणसे साऱ्यांना आवडतात आणि समाजाच्याही प्रशंसेचा व प्रसंगी लोभाचा विषय होतात. असे होण्याचे भाग्य भाग्यश्री पेठकर हिला लाभले आहे. तिला मी महाविद्यालयीन वयापासून प्रौढत्वाने समृद्ध होतपर्यंत पाहत आलो. ती मला नेहमीच माझ्या मुलीसारखी वाटत आली आणि घरच्या मुलीला जसे पाहावे आणि जाणावे तसे मी तिला पाहत व जाणत आलो. एक कमालीची संवेदनशील, चटकन् डोळ्यांत पाणी आणि दुसऱ्याच क्षणी ओठावर हसू येईल असे तिला जगलेले मी पाहिलेले आहे. तिला सुचलेले 'जगण्यातले काजवे' हे नावही बहुधा तिच्या याच प्रकृतीमुळे सुचले असणार. एका प्रचंड दुःखातून स्वतःच्या बळावर धडपडत उठणे आणि आपल्या अस्तित्वाची खूण इतरांना जाणवून देणे ही गोष्ट साधी नाही. शिवाय या प्रवासात आपल्या मनाचे निर्लेप आनंदीपण जपणेही सोपे नाही. भाग्यश्रीला या गोष्टी जमल्या आहेत.
Share
