Skip to product information
1 of 2

Jagane Gondun Ghetana By Dr. Aditi Kalmekha (जगणे गोंदून घेताना )

Jagane Gondun Ghetana By Dr. Aditi Kalmekha (जगणे गोंदून घेताना )

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

स्वतःचा स्वर घेऊन आलेली अदिती यांची कविता स्व आणि भवतालाला कवेत घेऊन समग्राशी संवाद करणारी कविता आहे. आपल्या जिवंतपणाची खात्री करुन जगण्याच्या वाटचालीतल्या गावांचा ती जसा शोध घेते तशीच आजीच्या लुगड्याच्या गोधडीतला उबदारपणाही जपते. एखादं विरळ होत जाणारं जंगल आणि तसंच घर कवयित्रीला साद घालत रहातं. पोटावरले स्ट्रेचमार्क्स, बुद्ध होण्याची आस, मनाचा आणि बाईपणाचा समंजस शोध त्यातून येणारी व्याकुळता या कवितेतून मातीच्या भिंतीत पावसाळी ओलावा पसरत जावा तशी सर्वदूर पसरत गेलेली आहे. यामुळेच ही कविता एका परिपक्क आणि खोल रुजलेल्या अशा संवेदनशील मनाची कविता वाटते.

'माझ्या अस्तित्वाची मुळं दूर दूर पसरत आलीत नदीप्रमाणे' अशा विधानातून कवयित्री केवळ एक भागधेयच मांडत नाही तर स्थलांतराची एक जैव जाणीव देखील मांडते. अतिशय साध्या भाषेत संवादी होत, वेळप्रसंगी एखादी ओवी गुणगुणत कुठलीही कुरकुर न करता आपल्या बाईपणासोबतच भवतालाचा निरंतर शोध घेणारी ही कविता वर्तमानातल्या गंभीर प्रकृतीच्या कवितेला समृद्ध करणारी कविता आहे.

मुळात या कवितेचे नाते अबोलपणाशी आहे. पंखात चोच खुपसून बसलेली निर्विकार पाखरे या कवितेत भेटत जातात, तशीच 'कागद आणि पेन असेल तरच लिहिली जाते का कविता?' असे प्रश्न विचारणारी जाणीवही. उपवास करणाऱ्या बाया बाईपणाच्या जगण्याचा अवधा अवकाश मांडून जातात. वेळप्रसंगी परंपरेला सोबत घेऊन निर्भयपणे स्वत्वाचा आणि समूहभावाचा शोध घेणारी अनेकार्थाने जगणे गोंदून घेणारी ही कविता आहे.

अतिशय तीव्र अशा उत्कटतेसोबतच या कवितेच्या परिघातून व्यक्त होणारा सांस्कृतिक अवकाश पारंपरिक स्त्रीवादाच्या कक्षा ओलांडून एकूण मानवी संवेदनेशी नाते सांगणारा, म्हणूनच महत्त्वाचा.

View full details